सातारा : दुर्गम भागातील गावांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीटंचाई

सातारा : दुर्गम भागातील गावांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली

सातारा : सध्या जिल्ह्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या असून दुर्गम भागातील गावांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी दुष्काळी भागात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नसली तरी आगामी महिनाभरात काही वाड्या-वस्त्यांवर टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. सध्या तरी टॅंकर मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे आलेला नाही. जिल्ह्यात रोजगार हमीची एक हजार ३२ कामे सुरू असून त्यावर चार हजार ५९२ मजूर काम करत आहेत. ग्रामपंचायत विभागाकडील ४१९, तसेच कृषी विभागाकडून फळबाग लागवडीची ५८२ कामे सुरू आहेत.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळा चांगला झाला असला तरी सध्याच्या स्थितीत डोंगराकडेच्या भागातील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. आणखी दोन-तीन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पण, त्याची तीव्रता फारशी नसली तरी पुढील महिन्यात या गावांकडून टॅंकरची मागणी होण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत तरी कोणत्याही वाडी-वस्त्यांकडून टॅंकरची मागणी झालेली नाही. दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यांत अद्यापपर्यंत तरी कोणत्याही गावाने अथवा वाड्या-वस्त्यांनी टॅंकर मागणी केलेली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. पण, मागणी झाल्यास तातडीने टॅंकर सुरू करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

रोजगार हमी योजनेची

यंदाच्यासाठी ७२ लाख मनुष्य दिवस निर्मितीचे समृध्दी बजेट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना कामाची कमतरता जाणवणार नाही.

- विजया यादव, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग

Web Title: Satara Water Scarcity Already Being Felt Remote Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..