शाब्बास कोरोना योद्‌ध्यांनो... आम्हाला तुमचा अभिमान!

patan
patan
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : येथील बाजारपेठेसह अनेक वाड्यावस्त्यांचे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या मंद्रुळकोळे (ता. पाटण) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून तीन महिन्यांपासून जीव धोक्‍यात घालून सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांचा ग्रामपंचायतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. या आगळ्या कौतुकाने सत्कारमूर्ती भारावून गेले. पाठीवर पडलेल्या शाबासकीच्या थापेने लढण्यासाठी हत्तीचे बळ मिळाल्याच्या प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या. 

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाशी लढताना मंदुळकोळे ग्रामपंचायतीने नियोजन करून जनजागृती केली. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन संकल्पना राबवत कोरोनाला गाव परिसरात प्रवेश करून दिला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, पोलिस पाटील, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे त्याकामी मोठे योगदान लाभले. या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामपंचायतीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्या हस्ते सत्कार झाले. कार्यक्रमास सरपंच अमोल पाटील, उपसरपंच पोपटराव कळंत्रे, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, सदस्य सर्जेराव पाटील, संजय पाटील, संपत यादव, संतोष अवघडे, रत्नमाला धस, रेखा ढेब, नीलम सुतार, शारदा सुतार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंतराव काळुगडे आदी उपस्थित होते. 

हिंदुराव पाटील म्हणाले, ""योग्य नियोजनाच्या जोरावर सर्वांनी चांगले काम केले आहे; परंतु ही लढाई अजून संपलेली नाही. प्रत्येकाने गांभीर्य ओळखून यापुढील काळातही सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.'' संतोष घोडे यांनी प्रास्ताविक केले. पोपटराव कळंत्रे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Koyna Dam submerged villages history
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment
Marathi News Esakal
www.esakal.com