शाब्बास! वीटभट्टी कामगाराच्या मुलाला बारावीत 94 टक्के गुण

koregaon
koregaon
Updated on

तारळे (जि. सातारा) : घरची आर्थिक स्थिती बेताची, आई-वडिलांचे जेमतेम शिक्षण, मार्गदर्शनाचा अभाव अशा बिकट परिस्थितीतून मेहनत व अभ्यास करून पृथ्वीराजने बारावीच्या परीक्षेत धवल यश संपादन केले. खावली येथील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयातून त्याने 94 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. 

तारळे (ता. पाटण) येथे किरण व पद्मिनी भुई हे दांपत्य विजापूरहून 30 वर्षांपूर्वी आले. झोपडीत संसार थाटत वीटभट्टीवर काम करत गुजराण सुरू केली. या दांपत्याने पृथ्वीराजला शिकविण्याचा ध्यास घेतला. त्याचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. आई-वडिलांनी त्याला जमेल तसे बळ दिले. पृथ्वीराजनेही परिस्थिती आड येऊ न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दुसऱ्यांच्या वह्या, पुस्तके घेऊन त्याने झोपडीत अभ्यास केला. 

चौथी व सातवीमध्ये त्याने स्कॉलरशीप मिळवून बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली. आठवीत असताना नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झाली. बारावीपर्यंत तेथेच शिक्षण झाले. नुकताच बारावीचा निकाल लागला. त्यात पृथ्वीराज हा 94 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. या यशात त्याला विद्यालयाचे प्राचार्य आर. टी. लाड व एस. सी. तिवारींचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचेही पृथ्वीराजने आवर्जून सांगितले. या यशाने त्याच्या आई, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आपल्या कष्टाचे मुलाने चीज केल्याची भावना दोघांनी बोलून दाखवली. कोणत्याही सोयी, सुविधा, शिकवणी वर्ग न घेता, आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता पृथ्वीराजने मिळविलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे. 


स्वतःचे कौशल्य वापरले आणि मेहनत घेतली तर काहीच अशक्‍य नाही. बारावीनंतर मला राष्ट्रीय संरक्षण अकादमीत जाऊन आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून काम करण्याची इच्छा आहे. 

- पृथ्वीराज भुई 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Illegal Land Allotments to Be Reinvestigated; Relief for Dam Project Victims
Drowning Tragedy in Nira Canal: One युवक Dead, Another Still Untraced
Public Comfort Boost: Free Sanitation Facilities at ST Bus Stations from June
Sangvi Tree Cutting Row: Locals Demand Panchanama, Forest Officials Under Fire
Marathi News Esakal
www.esakal.com