कशात अडकली पोलिसांची रेनकोट खरेदी

karad
karad
Updated on

सातारा : कोविडसाठी आमदार व खासदार निधी खर्च करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी आमदार निधी कोविडवर खर्च करताना अनेक बंधने घातली आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठीची रेनकोट खरेदीही रखडण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर आमदारांना मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कोविडसाठी खर्च करण्याची मुभा मिळणे अपेक्षित आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सध्याच्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना रेनकोट उपलब्ध करावेत. त्यासाठी आमदार फंडातून निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. पण, आमदार निधी खर्च करण्यात बंधने असल्याने पोलिसांच्या रेनकोटसाठी विशेष बाब म्हणून निधी खर्च करण्याची परवानगी शासनाकडे मागावी लागणार आहे. जिल्ह्यातील पोलिसांच्या रेनकोटसाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च येणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क आहे. लॉकडाउन करूनही कोरोनाची साखळी तुटत नाही. त्यामुळे रुग्ण वाढू लागल्यामुळे त्यांना सुविधा पुरविणे जिकिरीचे होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध केला जात आहे. त्यासोबतच आमदार व खासदारांचा वार्षिक फंडही कोरोनासाठी वापरण्यात येत आहे. पण, कोरोनासाठी आमदार निधी खर्च करताना काही बंधने टाकण्यात आली आहेत. परिणामी मतदारसंघात विविध उपाययोजनांसाठी निधी खर्च करता येत नाही. 

कोविडसाठी आमदारांना त्यांच्या निधीतून 50 लाख खर्च करण्याची परवानगी आहे. त्यापैकी 20 लाख रुपये उपलब्ध केले असून, हा निधी खर्च करण्यासाठी बंधने घातली आहेत. हॅण्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क या तीन बाबी मतदारसंघात वाटायच्या म्हटले तर त्यासाठी केवळ दहा लाखांचे बंधन घातले आहे. परिणामी मतदारसंघात त्यांचे वाटप करताना एखाद्या गावात दिले आणि दुसऱ्या गावात दिले नाही, असे झाल्यास आमदारांची अडचण होते. या व्यतिरिक्त एखाद्या कामासाठी निधी खर्च करायचा असेल तर विशेष बाब म्हणून त्याची शासनाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. सध्या पावसाने जुलैमध्येच दडी मारल्याने दुष्काळी माण, खटाव तालुक्‍यांत पाणीटंचाई जाणविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीत करायच्या कामांसाठीही आमदारांना निधी खर्च करता येणार नाही. त्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार व खासदार फंडातील सर्वच निधी कोविडसाठी खर्च करण्याची परवानगी शासनाकडे मागावी, अशी विनंती केली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Krishna River Pollution
Miraj Construction Accident
Fertilizer Allocation System
Traffic Change in Ganeshotsav
Marathi News Esakal
www.esakal.com