सातारा : जिल्ह्यात S .T ची चाके पुन्हा रुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S.T..

सातारा जिल्ह्यात S.T. ची चाके पुन्हा रुळावर

सातारा: गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपाची काहीशी धग कमी होत चालली आहे. जिल्ह्यातील कर्मचारी कामावर हजर होण्याच्या प्रमाणात दररोज वाढ होत असल्याने एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ११ आगारांतून दररोज सरासरी ६०० हून अधिक फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपात सुरवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे ११ आगारांतील बस जागेवरच उभ्या होत्या. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने चार बैठका घेतल्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, काही संघटनांच्या प्रतिनिधींनी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

आता आंदोलनाचे वारे कमी होत कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातदेखील हळूहळू वाढ होत आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे मागील एक महिन्यापासून कायमस्वरूपी तत्त्वावरील कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध डेपोत बाराशेहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाल्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या लालपरीसह इतर ठिकाणी शिवशाही, हिरकणी या बसही विविध आगारांतून सुरू झाल्या आहेत.

सद्य:स्थितीत दहावी व बारावीची परीक्षा सुरू असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात फेऱ्यांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांची गैरसौय काही प्रमाणात दूर झाली आहे. बहुतांश संघटनांनी संपातून माघार घेतल्याने संपातील धग कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसांत १००

ध्वनिक्षेपकाचा आवाज घुमू लागला

एसटी आगारात मार्गावर संचलनात जाणाऱ्या एसटीची नावे पुकारताना कर्मचाऱ्याच्या आवाजाचा विशिष्ट लहेजा असतो. मात्र, दीड वर्ष कोरोनामुळे आणि त्यानंतर संपामुळे चार महिने एसटी फेऱ्या बंद असल्याने बस स्थानकांसह आगारांमध्ये शांतता होती. मात्र, मागील दीड ते दोन महिन्यांपासून आगारातील ध्ननिक्षेपक सुरू झाल्याने प्रवाशांच्या कानामध्ये पुन्हा एकदा आवाज घुमू लागला आहे.

सातारा-पुणे मार्गावर ३० फेऱ्या

जिल्ह्यात मध्यवर्ती बस स्थानकातून सातारा-पुणे विनाथांबा दररोज ३० फेऱ्या, सातारा-मुंबई सेंट्रल- १० फेऱ्या, सातारा-बोरिवली- ३० फेऱ्या, फलटण-बोरिवली, वडूज-मुंबई, कऱ्हाड-मुंबई व इतर आगारांतून बस सोडल्या जात आहेत. राज्यातील लांब पल्ल्याच्या बसचे आरक्षणही सुरू करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

३८ कंत्राटी चालकांची भरती

गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने बहुतांश आगारांत कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत ३८ कंत्राटी चालकांची भरती केली करण्यात आली आहे. अजून १२ चालकांची भरती करणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Satara Wheels St Back Track District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Abdul SattarSataraST
go to top