

Family Took Loan for Her MBBS One Month Before Posting She Died
Esakal
फलटण इथं उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टरनं गळफास घेत आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडालीय. मूळची बीड जिल्ह्यातली ही महिला डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती. तिचा करार संपण्यासाठी काहीच महिने राहिले होते. त्याआधीच तिनं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शेतकरी वडिलांनी कर्ज काढून आणि पै-पै जोडून तिला डॉक्टर बनवलं होतं.