
सातारा : चारित्र्याच्या संशयावरून अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, मूळ रा. पानमळेवाडी, ता. सातारा. हल्ली रा. रवी रिजन्सी, मंगळवार पेठ, सातारा) यांचा शुक्रवारी रात्री पतीने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. खुनानंतर अंजली यांचा मृतदेह कॉटखाली कपड्याच्या गाठोड्याखाली लपवून ठेवण्याचा प्रयत्न राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२) याने केला होता. याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जात मृतदेह आणि संशयितास ताब्यात घेतले.