esakal | साताऱ्यातील महिलेचा पुसेगावात अपघाती मृत्यू; पती गंभीर जखमी | Accident
sakal

बोलून बातमी शोधा

accident

साताऱ्यातील महिलेचा पुसेगावात अपघाती मृत्यू; पती गंभीर जखमी

sakal_logo
By
सलीम अत्तार

पुसेगाव - येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी सांगितले, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुसेगाव - सातारा रस्त्यालगत असलेल्या सेवागिरी द्रोण पत्रावळी पूजा साहित्याच्या दुकानासमोर विशाल अनिल मोरे (वय २२, रा. आकाशवाणी, झोपडपट्टी, सातारा) हे आपली पत्नी पूजा (वय १९) यांच्यासह मोटारसायकलवरुन साताऱ्याकडे चालले होते. त्याचवेळी आयुब नुरमहंमद भालदार (रा. करंजेनाका, सातारा) हा ट्रक घेऊन साताऱ्याकडे चालला होता. या भरधाव ट्रकने विशाल मोरे यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात विशाल यांची पत्नी पूजा यांचा मृत्यू झाला. विशाल मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद लखन भिमराव मोरे (रा. आकाशवाणी, झोपडपट्टी, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस नाईक व्ही. एम. भोसले घटनेचा तपास करत आहेत.

loading image
go to top