व्वा... पवारांनी दाखवली शेतीत "पॉवर'

man
man

दहिवडी (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या काहींनी उभ्या पिकावर नांगर फिरवला, तर काही जण हताश होऊन हातपाय गाळून बसले. मात्र, येथील रानमळ्यातील पवार कुटुंबाने एकजुटीतून लॉकडाउनच्या काळात शेती विकसित केली. योग्य नियोजनामुळे शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. 

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात थोड्या घाबरलेल्या, गोंधळलेल्या अवस्थेत प्रत्येक जण होता. दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक अजित पवार व त्यांच्या सर्व कुटुंबांची अवस्था काही वेगळी नव्हती. या काळात कधी नव्हे ते सर्व कुटुंब एकत्र आले होते. त्याचा फायदा घेऊन शेतीत नावीन्यपूर्ण काम करण्याचा निश्‍चय सर्वांनी केला. घरातील आई, तिघे भाऊ, त्यांच्या पत्नी, मुले या सर्वांनी एकत्रित येऊन शेती विकसित करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांत शिंदी खुर्द (ता. माण) येथे 11 एकर शेतात केशर आंब्याची तीन हजार रोपे, शेवग्याची पाच हजार रोपे व डाळिंबाची दोन हजार रोपे लावली. सर्व क्षेत्रात शेणखत टाकून हे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले. दहिवडी येथील रानमळा येथील 18 एकर क्षेत्रावर डाळिंबाची पंधराशे रोपे, चिकूची 100 रोपे, शेवग्याची तीन हजार रोपांसह टोमॅटो, मका, सीताफळ, रामफळ व देशी केळीही लावली आहे. 

शासकीय अनुदानातून एक कोटी पंच्चाहत्तर लाख लिटर क्षमतेचे शेततळे काढलेले असून, त्यामध्ये मत्स्य बीज सोडले आहे. नवीन विहिरीलाही चांगले पाणी आहे. पवार कुटुंबीय हे माळवे व फळेही हात काट्यावर विकतात. विविध गावांतील गरजू मुलांना हा माल उपलब्ध करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत करतात. या काळात दररोज व्यायाम, योगासने, नैसर्गिक शुद्ध शाकाहारी आहार, एकत्रित चर्चा, गप्पा या माध्यमातून संपुर्ण कुटुंब एका मजबूत धाग्यात बांधले गेले आहे. 


अचानक जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेचे काय करायचे हा प्रश्न समोर होता; पण घरातील सर्व सदस्यांच्या सोबतीने संपूर्ण शेती स्वतः कष्ट करून व आधुनिक पद्धतीने विकसित केली. फळबागांकडे लक्ष केंद्रित करून नियमित उत्पन्न मिळेल, याची बेगमी केली. सध्या काही पिकांचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली असून, चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. 

- अजित पवार, नगरसेवक, दहिवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com