esakal | आठवणीतील अयोध्या :आमच्यासाठी रथाची निघालेली मिरवणूक स्वप्नवतच होती, सातारा जिल्ह्यातील कारसेवकांना अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

आठवणीतील अयोध्या :आमच्यासाठी रथाची निघालेली मिरवणूक स्वप्नवतच होती, सातारा जिल्ह्यातील कारसेवकांना अश्रू अनावर

अयोध्येतला तो दिवस म्हणजे एक सोहळाच होता. अयोध्या जणू रस्त्यावर आली होती. सर्वत्र दिव्यांची रोषणाई झाली होती. मिठाईवाल्यांनी आपली दुकाने मोकळी केली होती. अनेकांनी कारसेवकांना जेवणे घातली. संपूर्ण भारावलेले वातावरण होते.

आठवणीतील अयोध्या :आमच्यासाठी रथाची निघालेली मिरवणूक स्वप्नवतच होती, सातारा जिल्ह्यातील कारसेवकांना अश्रू अनावर

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : प्रत्येक कारसेवकांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्वप्नपूर्तीचा हा सोहळा असल्याचे सांगत येथील ज्येष्ठ कारसेवक सुरेंद्र ऊर्फ नाना शालगर यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर राम मंदिरासाठी ऐन तारुण्यात झगडणाऱ्या जिल्ह्यातील कारसेवकांच्या आठवणींना उजाळा दिला.
भाजीविक्रेत्याच्या कन्येने लावले चार चॉंद
 
राम जन्मभूमीसाठी झालेल्या लढ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कारसेवकांनी आपले योगदान दिले आहे. त्यामध्ये सातारा शहरातील नाना शालगर हे अग्रस्थानी होते. आज (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी त्या वेळी जे केले ते सर्व अद्वितीय होते. रामाच्या कृपेनेच केवळ सर्व काही करू शकलो, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते. त्या वेळी केलेल्या गोष्टींच्या स्मृती आठवताना त्यांच्या भावना प्रचंड उफाळून येत होत्या. 

धाडसी निर्णय..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार, सातारकरांनाे अटी वाचा

नाना म्हणाले, ""एकूण तीन वेळा अयोध्येला जाणे झाले. पहिल्यांदा गेलो, आता नेमके वर्ष आठवत नाही. त्या वेळी झाशीमध्येच आम्हाला अडविण्यात आले. आम्हाला अटक करून एका शाळेत ठेवण्यात आले. तेव्हा गोळीबार झाला होता. हजारो कारसेवक त्यात गेले; परंतु आम्ही कधीही खचलो नाही.'' दुसऱ्या वेळेला आम्ही सातारा ते कोल्हापूर ते अयोध्या व पुन्हा सातारा अशी रथ यात्रा काढल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजारपणामुळे त्यांना नेमकी नावे सांगता येत नव्हती; परंतु शिवथरच्या साबळेंनी रथासाठी नवी कोरी गाडी दिली. त्या वर्षीचे गणपती विसर्जन झाले. त्याच रात्री आम्ही रथाच्या कामाला सुरवात केली. मुकुंद पालकर यांनी त्यांचे वर्कशॉप व माणसे विना अट, विना मोबदला आमच्या स्वाधीन केले होते. तीन दिवस अखंड काम करून आम्ही रथ तयार केला. दोन ट्रक, दोन जीप व सुमारे दीडशे दुचाकी असे अडीचशे ते तीनशे जण अयोध्येला गेलो. त्या वेळी अयोध्येतून रथाची निघालेली मिरवणूक स्वप्नवतच होती. बाबूजी नाटेकर, संभाजी जाधव, राजेंद्र परदेशी, विजय नाफड, तिताडे बंधू असे अनेक लोक आमच्या बरोबर होते. त्यानंतर अयोध्येला गेलो ते सहा डिसेंबर 1992 च्या दिवशी. त्या वेळी रेल्वेने गेलो होतो, असे ते म्हणाले.

हे कारसेवक व मान्यवर म्हणतात, राममंदिर भूमिपूजनातून राष्ट्रमंदिराची उभारणी ! - 
 
अयोध्येतला तो दिवस म्हणजे एक सोहळाच होता. अयोध्या जणू रस्त्यावर आली होती. सर्वत्र दिव्यांची रोषणाई झाली होती. मिठाईवाल्यांनी आपली दुकाने मोकळी केली होती. अनेकांनी कारसेवकांना जेवणे घातली. संपूर्ण भारावलेले वातावरण होते. त्या वेळी ढाच्याच्या आतमध्ये ठेवलेल्या चांदीच्या राम-लक्ष्मणाच्या मूर्तींना मला कपाळ लावता आले. तो स्पर्श आजही माझ्या हातात जिवंत आहे. केवळ रामाच्या कृपेनेच मला तो सोहळा पाहात आला. मी धन्य झालो.   हा दिवस सर्वांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेऊ नये : शिवेंद्रसिंहराजे
 
कार सेवा केलेल्या विठ्ठल बलशेटवार यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ""त्या दिवशी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी हे सर्वांना प्रतीकात्मक पूजन करण्याचे आवाहन करत होते; परंतु लाखोंच्या समुदायाने ढिगाऱ्याकडे कूच केली. काही ढाच्यावर चढले. मीही अवघा वीस वर्षांचा होतो. मीही तेथे गेलो होतो. सायंकाळी कर्फ्यू लागल्याने आम्हाला आमच्या निवासाच्या ठिकाणीही जाता आले नव्हते. त्या वेळी प्रतीकात्मक मंदिराच्या उभारणीतही हातभार लावला होता. तरुण वयापासून उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. माझ्यासह सर्व कारसेवकांसाठी हा दिवस सर्वोच्च आनंदाचा आहे, असेही ते म्हणाले.

कोयना धरणाचा पाणीसाठा तब्बल आठ टीएमसीने वाढला, 73 वर पाेचताच दरवाजे उघडणार ? 

Edited By : Siddharth Latkar