Satara Politics
esakal
राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्ह्यात निवडणूक मोहिमेची तयारी सुरू केली.
२५ जागांवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनीती आखली जात आहे.
कऱ्हाड (सातारा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (local Body Elections) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात निवडणुका लढवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर आमची तयारी सुरु आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुमारे २५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी येथे व्यक्त केला.