esakal | संतोष धोत्रे यांची सोलापूरला बदली! वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad Satara

जिल्हा परिषदेतील कार्यकाल संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू आहे.

संतोष धोत्रे यांची सोलापुरला बदली! वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सातारा: जिल्हा परिषदेतील कार्यकाल संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या जागेवर रत्नागिरी जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या अर्चना वाघमळे यांची बदली झाली आहे.

हेही वाचा: सातारा : पुनर्वसानातील शेतकऱ्यांना तब्बल 21 वर्षांनी मिळाली जमीन

श्री. धोत्रे यांनी पदाधिकारी, अधिकारी, सदस्य यांच्याशी समन्वय साधून अनेक विकासकामे मार्गी लावली होती. जिल्ह्यातील कामाचा त्यांचा कार्यकाल संपल्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांची वर्णी लागली आहे. धोत्रे यांच्या जागी जिल्हा परिषदेत या आधी काम केलेले महादेव घुले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सातारा : लाच प्रकरणी वरकुटे-म्हसवडचा तलाठी जाळ्यात

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची नुकतीच बीड येथे बदली झाली होती. त्यांच्या रिक्त असणाऱ्या जागेवर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांची नियुक्ती झाली आहे. त्या मूळच्या सातारा तालुक्यातील कण्हेर गावच्या असून, त्यांनी या आधी कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर जत, उस्मानाबाद आदी ठिकाणी काम केले आहे.

loading image
go to top