esakal | सातारा : पुनर्वसानातील शेतकऱ्यांना तब्बल 21 वर्षांनी मिळाली जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

Farm land

1999 मध्‍ये ठोसेघर येथील सीताराम गायकवाड यांच्‍यासह 26 जणांची जमीन तारळी प्रकल्‍पासाठी जमिनीचे संपादन करण्‍यात आले होते.

सातारा : पुनर्वसानातील शेतकऱ्यांना तब्बल 21 वर्षांनी मिळाली जमीन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : ठोसेघर (Thoseghar) येथील प्रकल्‍पासाठी संपादित केलेल्‍या जमिनीच्‍या बदल्‍यात देण्‍यात येणारी जमीन २६ जणांना तब्‍बल २१ वर्षांनी मायणी (ता. खटाव) येथे मिळाली. मिळालेल्‍या जमिनीची पूजा करत या पुनर्वसितांनी त्‍या ठिकाणी शेतकामास सुरुवात केली. त्‍यांनी या बद्दल शासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

विकासकामांसाठी शासनाकडून अनेक प्रकल्‍प निर्माण करण्‍यात येतात. या प्रकल्‍पांसाठी आवश्‍‍यक असणारी जागा संपादित करत त्‍या बदल्‍यात त्‍या ठिकाणच्‍या शेतकऱ्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्‍यात येते. अशाच पद्धतीने १९९९मध्‍ये ठोसेघर येथील सीताराम रावजी गायकवाड यांच्‍यासह २६ जणांची काही जमीन तारळी प्रकल्‍पासाठी (Tarli Project) जमिनीचे संपादन करण्‍यात आले होते. प्रकल्‍प पूर्ण झाला आणि त्‍या शेतकऱ्यांची राबलेली शेत पाण्‍याखाली गेली. या बदल्‍यात शेतकऱ्यांना जमीन देण्‍याचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात आला होता.

हेही वाचा: कुस्तीच्या आखाड्यासाठी 5 वर्षांनंतर सत्ताधारी-विरोधक 'एकत्र'

तब्‍बल २१ वर्षे यासाठीचा पाठपुरावा शेतकरी तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), तत्‍कालीन जलसंपदामंत्री आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar), श्रमिक मुक्‍ती दल करत होते. या पाठपुराव्‍याला यश येत ठोसेघर येथील शेतकऱ्यांना मायणी येथे जमीन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. त्यानुसार सीताराम गायकवाड यांच्‍यासह २६ जणांना नुकतेच जमिनीचे वाटप करून त्‍याचे कब्‍जेपटी देण्‍यात आली. ही जमीन ताब्‍यात मिळाल्‍याने शेतकरी आनंदले असून, त्‍यांनी जमिनीची पूजा करत काळ्या आईप्रती श्रद्धा व्‍यक्‍त केली.

loading image
go to top