
-उमेश बांबरे
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत खुल्यासोबतच इतर मागास प्रवर्गाच्या जागांवरही स्पर्धा वाढणार आहे. मराठा समाजातील अनेकांनी कुणबी दाखले काढले आहेत. त्यांना खुल्यासोबतच ओबीसी जागेवरही निवडणुकीत लढता येणार आहे. ही संधी ओळखून अनेकांनी कुणबी दाखले काढून त्याच्या जातपडताळणीसाठी अर्ज केले आहेत. जातपडताळणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कुणबी दाखले ओबीसी जागेवर स्पर्धा वाढविण्याची शक्यता आहे.