Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Police Suspension : पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांशी झालेल्या झटापटीत दुखापत झाली. या प्रकरणी त्यांनी आज विधानपरिषदेत आवाज उठवला. उपसभापतींनी आदेश देताच 100 पोलिसांसह एसपी तुषार दोषी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
BJP wins Satara ZP election amid controversy; police suspension and cross voting drama shake Maharashtra politics.

BJP wins Satara ZP election amid controversy; police suspension and cross voting drama shake Maharashtra politics.

esakal

Updated on

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित आणि धक्कादायक विजय मिळवला आहे.अवघ्या एका-तीन मतांच्या फरकाने भाजपने सत्ता काबीज केली.ही निवडणूक अत्यंत नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन सदस्य फुटल्याने (क्रॉस वोटिंग) भाजपला फायदा झाला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला. यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत मांडण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com