Jawali Taluka ZP and Panchayat Samiti Election Results
esakal
कास : जावळी तालुक्यातील भाजपाचे दिग्गज नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी जावळी तालुक्यातील म्हसवे गटात 2227 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप पवार यांचा त्यांनी पराभव केला. मानकुमरे यांना 9898 मते मिळाली तर शिवसेनेच्या संदीप पवार यांना 7671 इतकी मते मिळाली.