Satara ZP: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे अडचणीत?, कुणबी दाखल्याच्या पुराव्यांची होणार पडताळणी, कुणबी दाखला आणि अपात्रता प्रकरण चर्चेत..

Satara ZP Kunbi certificate: कुणबी दाखल्यावरून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे अडचणीत; जात पडताळणी समितीसमोर तक्रारदारांच्या पुराव्यांची सखोल पडताळणी होणार
Satara Zilla Parishad Politics Heats Up Amid Caste Certificate Controversy

Satara Zilla Parishad Politics Heats Up Amid Caste Certificate Controversy

sakal

Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार संतोष साळुंखे व जयदीप मगर यांना नसून ही तक्रार रद्द करावी, याबाबत डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकिलांनी केलेला अर्ज जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांनी निकाली काढला. आता पुढील सुनावणीत कुणबी दाखल्याबाबत तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यांची पडताळणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com