
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गणांच्या पुनर्रचनेवर हरकती, आक्षेप नोंदविण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत गटांसाठी ५५, तर गणांसाठी ४८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सातारा तालुक्यातून गटासाठी २८, खटाव तालुक्यातून गणांसाठी सर्वाधिक १९ हरकती दाखल आहेत. या हरकतींवर आयुक्त कार्यालयाकडे पाठवून त्यावर ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टला गट, गणांची अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षणे जाहीर झाल्यावर निवडणुकीच्या हालचाली सुरू होतील.