
सातारा : पुढील सहा महिन्यांत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी पाठक हॉलमध्ये झालेल्या साहित्यप्रेमी सातारकर, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत संमेलन एकजुटीने आणि देखण्या नियोजनाच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा निर्धार केला. या पहिल्याच बैठकीत एक लाख पंधरा हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला.