सातारा : रेशनकार्डधारकांची केवायसी करून घेण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. जिल्ह्यातील ७२ टक्के लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित २८ टक्के लाभार्थ्यांची केवायसी होणे बाकी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने केवायसी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व लाभार्थ्यांनी रेशनकार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.