
सातारा : एमआयडीसीतील सुमारे २० हजार स्क्वेअर मीटरचा एएम-२३ नंबरचा प्लॉट एक रुपया प्रतिस्क्वेअर मीटरप्रमाणे इएसआयसी हॉस्पिटलकरिता देण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाला आहे. एमआयडीसीने मुंबईच्या इएसआयसी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास याबाबत कळविले आहे. कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य हिताकरिता उभारण्यात येणाऱ्या इएसआयसी हॉस्पिटलच्या उभारणीस त्यामुळे गती मिळाली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.