

State Marathi Drama Awards: Satara Team’s ‘Pokal Ghissa’ Tops the List, ‘Khandani’ Runner-Up
Sakal
सातारा: महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सातारा केंद्रातून शिवशक्ती तरुण मंडळ, सातारा या संस्थेच्या ‘पोकळ घिस्सा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, तसेच पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा या संस्थेच्या ‘खानदानी’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.