
सातारा : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची देखावे उभारण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे. या कामातच गणेशमूर्ती मंडपात नेण्यासाठी आगमन सोहळे आयोजित करण्यात येत असून, मंगळवारी तीन मंडळांच्या मूर्तींपुढे झालेल्या ढोलताशांच्या निनादामुळे राजपथ दणाणून निघाला होता.