
सातारा : सातारा शहरासह परिसरातील डोंगररांगा आणि खुल्या जागेत दहा हजार झाडे लावत त्यांच्या संगोपनासाठीचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. यानुसार पालिकेने व इतर यंत्रणांनी विविध ठिकाणी साडेचार हजारहून झाडांची लागण केली आहे. आगामी काळात शहराजवळील डोंगररांगा आणि टेकड्यांवर झाडे लावण्यात येणार असून, त्यासाठीची सर्व तयारी पालिकेने केली आहे.