

IPS officer Santosh Chalke takes charge as security chief of Delhi Metro.
Sakal
सातारा : मूळचे साताऱ्याचे असलेले आयपीएस अधिकारी संतोष चाळके यांची दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. दिल्ली मेट्रोतून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. दिल्ली मेट्रोचे ३५४ किमीचे जाळे आहे. त्यामुळे आयपीएस चाळके यांच्यावर देशाच्या राजधानीत सोपविण्यात आलेली जबाबदारी विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या सुरक्षेसाठी १३ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे नेतृत्व संतोष चाळके करणार आहेत.