satara:भुयारी गटारामध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिरुद्ध संजय लाड

Satara:भुयारी गटारामध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

कऱ्हाड : शहरातील वाखाण परिसरातील भुयारी गटार योजनेतील गटार स्वच्छ करताना पालिकेचा एक कर्मचारी चेंबरमध्ये पडला. त्याला काढण्यासाठी गेलेला दुसराही त्या चेंबरमध्ये पडला. त्यामुळे त्या दोघांचाही श्वास गुदमरल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर इतर कर्मचारी व सजग नागरिकांनी तातडीने हालचाल करून पालिकेला माहिती देत संबंधित कर्मचाऱ्यांना गटारामधून काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अनिरुद्ध संजय लाड (वय २५, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव असून, अमोल किरण चंदनशिवे (वय ४८, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरात भुयारी गटार योजना आहे. त्याची स्वच्छता पालिकेकडून कर्मचाऱ्यामार्फत केली जाते. आज वाखाण परिसरात अनिरुद्ध लाड, धनाजी चंदनशिवे, प्रवीण चव्हाण, जयवंत लाड हे भुयारी गटार योजनेतील गटार स्वच्छ करत होते. दरम्यान, त्यातील अनिरुद्ध लाड हे गटारामधील चेंबरमध्ये पडले. त्यामुळे त्यांना काढण्यासाठी धनाजी चंदनशिवे हे आत गेले. दरम्यान ते गुदमरून बेशुद्ध झाले. ते समजताच उर्वरित दोघांनी तत्काळ तेथील नागरिकांना याची माहिती देऊन संबंधितांना गटारामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, पालिकेचे अग्निशमन दल, मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता ए. आर. पवार, अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले.

त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून गटारामध्ये पडलेल्या अनिरुद्ध लाड व धनाजी चंदनशिवे यांना चेंबरमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा हॉस्पिटलला हलवण्यात आले. दरम्यान, अनिरुद्ध लाड यांचा मृत्यू झाला, तर धनाजी चंदनशिवे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सायंकाळी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Satarasubway Drain Worker Dies After Falling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..