Satyajit Patankar: पक्ष बदलताना गुवाहाटीला गेलो नाही: सत्यजितसिंह पाटणकर; पालकमंत्र्यांना टाेला, नेमकं काय म्हणाले?
Satara News : ‘‘२५० गावे या प्रकल्पात घेतली आहेत. त्या गावांत ‘एमएसआरडीसी’ने टाकलेले आरक्षण कोणते आहे? हेही स्थानिकांना माहीत नाही. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यापूर्वी खासदार शरद पवार यांना सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पक्ष बदलत असताना आम्ही वेगळ्या वाटेने किंवा सुरतमार्गे गुवाहाटीला गेलो नाही, असाही टोला त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.