
पाटण : या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे. अद्यापही पाऊस न थांबल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य शेतकऱ्यांना शेतात पेरणी करता आली नाही. याशिवाय ज्यांनी पेरणी केली, त्यांचेही पावसाने पूर्णतः नुकसान केले आहे. त्यामुळे पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण व पेरणी करूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे करून पाटण मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.