Political News : प्रतापगड कारखान्याच्या अध्यक्षपदी शिंदेंची बिनविरोध निवड

Pratapgad Sugar Factory Election
Pratapgad Sugar Factory Electionesakal
Summary

कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती.

कुडाळ (सातारा) : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या (Pratapgad Sugar Factory) अध्यक्षपदी जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे (Saurabh Shinde) यांची, तर उपाध्यक्षपदी शिवाजीराव मर्ढेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सहकार पॅनलचे सर्व २१ उमेदवार बहुमताने निवडून आले होते. आज अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी करण्यासाठी नूतन संचालक मंडळाची बैठक बोलावली होती.

या वेळी अध्यक्षपदासाठी शिंदे व उपाध्यक्षपदासाठी मर्ढेकर यांचा प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केले. आगामी गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी या वेळी दिली. सर्व सभासदांनी मोठ्या विश्वासाने संचालक मंडळाला मोठ्या मताधिक्काने निवडून देऊन जी जबाबदारी संचालक मंडळावर टाकली आहे. ती सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार असून, कारखाना सुरू करणे हीच आमची खरी जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Pratapgad Sugar Factory Election
'महाराष्ट्र केसरी'चं दिमाखात उद्घाटन; साताऱ्यात कुस्तीची 'दंगल'

उपाध्यक्ष अॅड. मर्ढेकर म्हणाले, ‘‘माजी आमदार लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांना जशी साथ दिली. त्याच ताकदीने यापुढेही सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.’’ श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. निवडीनंतर अनेक मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर कार्यकत्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. बैठकीस संचालक राजेंद्र शिंदे, आनंदराव मोहिते, शांताराम पवार, अंकुशराव शिवणकर, रामदास पार्टे, प्रदीप शिंदे, प्रदीप तरडे, आनंदराव जुनघरे, बाळासाहेब निकम, गणपत पार्टे, दिलीप वांगडे, बाळकृष्ण निकम, कुसूम गोसावी, विजय शेवते, शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे, विठ्ठल मोरे, कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे आदी उपस्थित होते.

Pratapgad Sugar Factory Election
साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले, पण शेतकरी विरघळला : राजू शेट्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com