महाराजसाहेब.. आम्हाला न्याय द्या; SEBC च्या शिष्टमंडळाचे उदयनराजेंना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Udayanraje Bhosale

राज्यसेवेप्रमाणेच विविध सरळसेवा भरती प्रक्रिया 9 सप्टेंबर 2020 रोजीच पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सरकारने कोविडच्या कारणास्तव उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले नाही.

महाराजसाहेब.. आम्हाला न्याय द्या; SEBC च्या शिष्टमंडळाचे उदयनराजेंना साकडे

सातारा : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निर्णय दिला असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मात्र, राज्यात आरक्षण लागू असताना परीक्षा देऊन निवड झालेल्या उमदेवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या उमेदवारांना राज्य सरकारने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी मराठा समाजातील सूरज गुंजवटे, तुषार गुंजवटे, तुषार राजेभोसले, अरुण राजेभोसले, सागर पवार, निरंजन कदम, संकेत कदम, सूरज अवारे, सचिन चव्हाण, विपुल गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली. परंतु, सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांनी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना निवेदन देऊन आमचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली आहे. यावर उदयनराजेंनी देखील विद्यार्थ्यांना आश्वासन देत आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जरुर पोहचवू, अशी ग्वाही त्यांना दिली. (SEBC Students Met MP Udayanraje Bhosale Satara Marathi News)

राज्यसेवेप्रमाणेच विविध सरळसेवा भरती प्रक्रिया 9 सप्टेंबर 2020 रोजीच पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सरकारने कोविडच्या कारणास्तव उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले नाही. त्यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या. राज्यातील रखडलेल्या एसईबीसी नियुक्त्यासंदर्भात शुक्रवारी एका शिष्टमंडळाने उदयनराजे यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतली. एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या 2185 उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी उदयनराजेंकडे केली. त्यानंतर, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून मागणी करणार असल्याचे आश्वासन उदयनराजेंनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील या उमेदवारांना दिला आहे. उदयनराजेंनी शिष्टमंडळाला मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.

हेही वाचा: तीन महिन्यांची घरपट्टी माफ; राज्यातील एकमेव पालिकेचा निर्णय

राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मात्र, राज्यात आरक्षण लागू असताना परीक्षा देऊन निवड झालेल्या उमदेवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी होती. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन खटला, सरकारचा वेळकाढूपणा आणि कोरोनाचं कारण या सगळ्यात निवड झालेले उमेदवार भरडले जात आहेत. त्यामुळे, सरकारने प्राधान्याने लक्ष देऊन आम्हाला नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने खासदार उदयनराजेंकडे केली आहे. त्या मागणीस उदयनराजेंनी प्रतिसाद देत हा मुद्दा लवकरच सोडविण्याची ग्वाही दिली, त्यामुळे खासदारांनी घेतलेल्या भूमिकेने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भेटीप्रसंगी शिष्टमंडळाचे सूरज गुंजवटे, तुषार गुंजवटे, तुषार राजेभोसले, अरुण राजेभोसले, सागर पवार, निरंजन कदम, संकेत कदम, सूरज अवारे, सचिन चव्हाण, विपुल गायकवाड आदी उपस्थित होते.

साहेब.. सगळं काही उद्ध्वस्त झालं, आता तुम्हीच काहीतरी करा; शेतकऱ्यांची खासदारांना आर्त साद

SEBC Students Met MP Udayanraje Bhosale Satara Marathi News

loading image
go to top