

Shambhuraj Desai
सातारा - सातारा व औंध गॅझेट लागू करण्याबाबत सरकारचा अभ्यास सुरू आहे. मनोज जरांगे- पाटील यांना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे जरांगे- पाटील यांना दिलेल्या आश्वासनापासून सरकार तसूभरही मागे सरकणार नाही, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून मी अलिप्त आहे; पण या निवडणुकीत महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यातील पालकमंत्री कार्यालयात मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.