
-दिलीपकुमार चिंचकर
सातारा : अनाथ, मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पैशांअभावी शिक्षणाला पारख्या होणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या आणि अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाहू बोर्डिंगला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या बोर्डिंगमधून गेल्या शंभर वर्षांत गोरगरिबांच्या ४० हजार मुले- मुली शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत. आता हे बोर्डिंग राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा आधार झाले आहे.