साताऱ्यातील शाहू कलामंदिर पुनश्‍च हरिओमच्या प्रतीक्षेत

गिरीश चव्हाण
Thursday, 26 November 2020

साताऱ्याच्या शाहू कलामंदिराची आसन व्यवस्था 900 च्या घरात आहे. भव्य नाट्यगृह, दर्दी प्रेक्षक आणि इतर अनेक कारणांमुळे या ठिकाणी झालेल्या अनेक नाटकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा अनुभव घेतला आहे. साताऱ्यातील या नाट्यगृहामुळे येथील नाट्य चळवळ राज्यस्तरावर पोचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या तुफान पावसामुळे शाहू कलामंदिराच्या अंतर्गत भागात पाणी साठले आणि दुरावस्था झाली. पावसाचे पाणी साठल्याने स्टेज व भिंतीवर लावलेल्या लॅमिनेट शीटचे नुकसान झाले.

सातारा : लॉकडाउन, अपुरे मनुष्यबळ आणि सातारा पालिकेच्या इतर प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे शाहू कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींसह कलाकारांना येथे प्रयोग करण्यासाठी अजूनही काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दप्तरदिरंगाई व इतर कारणांमुळे सध्या तरी साताऱ्याचे शाहू कलामंदिर पुनश्‍च हरिओमच्या प्रतीक्षेतच आहे. 

साताऱ्याचे शाहू कलामंदिराची आसन व्यवस्था 900 च्या घरात आहे. भव्य नाट्यगृह, दर्दी प्रेक्षक आणि इतर अनेक कारणांमुळे या ठिकाणी झालेल्या अनेक नाटकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा अनुभव घेतला आहे. साताऱ्यातील या नाट्यगृहामुळे येथील नाट्य चळवळ राज्यस्तरावर पोचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या तुफान पावसामुळे शाहू कलामंदिराच्या अंतर्गत भागात पाणी साठले आणि दुरावस्था झाली. पावसाचे पाणी साठल्याने स्टेज व भिंतीवर लावलेल्या लॅमिनेट शीटचे नुकसान झाले. पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या कामास सुरुवात झाली. ध्वनी यंत्रणा, लाईट व्यवस्था, स्टेज बांधणी, मेक अप रुम दुरुस्ती व इतर अनेक कामांचा त्यामध्ये समावेश आहे. काही महिने हे काम अत्यंत गतिमान सुरू होते. त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाउन आणि त्यानंतर झालेल्या कामगारांच्या स्थलांतरामुळे दुरुस्ती थंडावली. 

घटनेच्या यशाबाबत बाबासाहेबांनी इशारा दिला होताच; दुर्दैवाने माेदींकडून बळाचा वापर हाेताेय : पृथ्वीराज चव्हाण

लॉकडाउननंतर केंद्र व राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्याने इतर सर्वच कामांचा वेग पूर्वपदावर येत गेला. मात्र, शाहूकला मंदिराच्या नूतनीकरणाचे काम रखडले. सध्या हे काम संथगतीने सुरू आहे. सद्यःस्थितीत नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा, स्टेज बांधणी व इतर तांत्रिक कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्याबाबतची तांत्रिक तपासणी बाकी आहे. मेकअप रूमची दुरुस्ती, त्याचे दरवाजे बदलणे, शौचालय व स्वच्छतागृहाची डागडुजी, कॅन्टीनची दुरुस्ती, अंतर्गत लाईटच्या कामांबरोबरच बाहेरील बाजूस डांबरीकरण करणे, पडलेली संरक्षक भिंत बांधणीचे काम रखडलेल्याचे दिसून येते. सध्या अंतर्गत व बाह्य कामांवर सुमारे 50 लाखांहून अधिक खर्च झाला असला, तरी शाहू कलामंदिरचे रुपडे किंचितसे बदललेले दिसत नाही. अनलॉकनंतर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे चालू झाली आहेत. अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोगही सुरू झालेत, मात्र साताऱ्यातील नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. हे काम रखडल्याने नाट्यप्रेमी, कलाकारांना सध्या तरी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान, पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी तांत्रिक कारणांमुळे, तसेच लॉकडाउनमुळे हे काम रखडले होते. हे काम आगामी काळात गतिमान करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. 

दुसऱ्या महायुद्धातील जगप्रसिद्ध काच कारखाना बंद; नेहरू, टिळकांनी दिली होती कारखान्यास भेट!

पावसाचे पाणी पुन्हा साठण्याची शक्‍यता
 
गत पावसाळ्यात शाहू कलामंदिरात झिरपलेले पाणी साठल्याने तळे निर्माण झाले होते. आगामी काळात असे पाणी नाट्यगृहात साठू नये, यासाठी स्टेजपुढील भागात चेंबर बांधण्यात आले आहे. या चेंबरमधून पाणी बाहेर वाहून नेण्यासाठी काढलेली पाइप खालील बाजूस राहिली असून, मुख्य गटार उंचीवर राहिले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यास पुन्हा आत पाणी साठून केलेला खर्च वाया जाण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Shahu Kalamandir in Satara Is In A Bad Condition Satara News