शाहूपूरी पाेलिसांचा निर्धार; खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या तक्रारदारांपर्यंत पोचणार

शाहूपूरी पाेलिसांचा निर्धार; खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या तक्रारदारांपर्यंत पोचणार

सातारा : मायाजाळात ओढून खंडणी उकळणाऱ्या महिलांनी कोथरूड परिसर तसेच सातारा जिल्ह्यातील काही व्यक्तींना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. पण, बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याने पुण्यापर्यंत जाऊनही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांनी आता स्वतःहून तक्रारदारांपर्यंत पोचण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, दोन महिलांची कोठडीची मुदत आज (मंगळवार) संपत असून, पोलिस कोठडी वाढवून मागणार की, न्यायालयात त्यांना जामीन मिळणार, यावर पुढील तपासाचे भवितव्य अवलंबून आहे.
 
एका डॉक्‍टरला व्हॉट्‌सऍपवर काढलेला अश्‍लिल व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसिध्द करण्याची भीती दाखवून जाळ्यात ओढणाऱ्या दोन संशयित महिलांना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी कोथरूड परिसरात काहींना अशा प्रकारे गंडा घातल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे रविवारी सायंकाळी श्रद्धा अनिल गायकवाड आणि पूनम संजय पाटील (सध्या रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. कोथरूड, पुणे) या दोन महिलांना घेऊन तपासासाठी पुण्याला गेले होते. कोथरूड परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये या दोन्ही महिला वास्तव्यास होत्या.

रेमडिसिव्हरचा दर कमी झाल्याने कंपन्यांकडून पुरवठा बंद? आरोग्य यंत्रणा हतबल

त्याठिकाणी पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली. तेथे सोने खरेदी केलेल्या पावत्या तसेच मोबाईलचे सीमकार्ड, बॅंक पासबुक पोलिसांच्या हाती लागले. या महिलांनी ज्या ठिकाणी सोने खरेदी केले होते, त्या दुकानांत त्यांना नेण्यात आले होते. संबंधित दुकानदाराने सोने खरेदीच्या आणखी पावत्या पोलिसांना दिल्या आहेत.

कोथरूड पोलिस ठाण्यात या महिलांनी काही पुरुषांविरोधात तक्रार केलेले अर्ज दाखल होते. त्या अर्जाद्वारे पोलिसांनी तक्रारदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुण्यामध्ये कोणीही तक्रारदार पुढे येण्यास तयार झाला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणांत वेगळी शक्कल लढवली आहे. या महिलांच्या मोबाईलमध्ये संग्रहित असलेल्या नंबरवरून तक्रारदारांचा शोध घेऊन संबंधित तक्रारदाराला तक्रार देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.

कोरोनामुळं सागरी जीवसृष्टीवर मोठा परिणाम होण्याचा धोका
 
पैसे गेले तर जाऊ देत. पण, बदनामी होऊ नये, यासाठी कोणीही पुढे आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. साेमवारी (ता.28) पहाटे या दोन्ही महिलांना घेऊन पोलिस अधिकारी वायकर पुन्हा साताऱ्यात आले. त्यानंतर दिवसभरात या महिलांच्या बॅंक खात्यात किती पैसे आहेत, याची पोलिसांनी तपासणी केली. मात्र, खात्यावर केवळ चार ते पाच हजार रुपये असल्याचे समोर आले आहे. मायाजाळात पुरुषांना ओढल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पैशातून या महिलांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

साता-यातच नव्हे साेलापूर जिल्ह्यातील दाेघींनी पुण्यातही अनेकांना फसविले
 
कोठडीची मुदत आज संपणार 

महिलांना मिळालेल्या पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल केले जाणार आहे. न्यायालय कोठडी वाढवून देणार की, त्यांना जामीन मिळणार, यावर पुढील तपासाचे भवितव्य अवलंबून आहे.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com