Shaktipeeth highway wildlife impact Maharashtra
esakal
गोंदवले (सातारा) : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यात माण आणि खटाव तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला (Shaktipeeth highway wildlife impact Maharashtra) आहे. मात्र, या नव्या विस्तारित मार्गामुळे या भागातील अतिसंवेदनशील गवताळ परिसंस्था आणि विशेषतः लांडग्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होणार आहे. अधिवास नष्ट झाल्यास भविष्यात या भागात शेतीचे नुकसान आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धकांनी व्यक्त केली आहे.