esakal | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा रद्द

बोलून बातमी शोधा

Shingnapur
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा रद्द
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापुरातील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे नुकतेच आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा 17 ते 27 एप्रिल या कालावधीत होणार असून यात्रेचा मुख्य दिवस 23 व 24 एप्रिल 2021 हा आहे. शिखर शिंगणापुरातील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड यांनाही कळविण्यात आले आहे.

Breaking News : भूकंपाने कोयना धरण क्षेत्र हादरले; 20 मिनिटांत दोन धक्के