

Minister Shambhuraj Desai Slams Mangalprabhat Lodha's 'Devabhau' Comment
sakal
कऱ्हाड : भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असे वक्तव्य भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार प्रहार केला. एकनाथ शिंदे यांनी २०२२ ला जी उठावाची भूमिका घेतली त्यामुळे भाजप सत्तेत आले आणि चांगला वाटा मिळाला. २०१९ मध्ये आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. शिवसेना भाजप युती भक्कम करण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले आणि भाजप ताकदवान झाले याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांभीर्याने विचार करावा असे सुनावले.