Shambhuraj Desai : महाबळेश्वरातील कामे बांधकाम विभागाकडे: शंभूराज देसाई यांची सूचना; मुंबईत आढावा बैठक
Mahabaleshwar : महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने महाबळेश्वर परिसरातील विकासकामे गतीने करा. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व यंत्रणांनी समन्वयातून पूर्ण करावीत.
Shambhuraj Desai addresses the Mumbai review meeting, directing the transfer of Mahabaleshwar works to the construction department.Sakal
मुंबई/महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे, तसेच डॉ. साबणे रस्त्यालगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अशी सूचना पर्यटन, खाण व स्वातंत्र्यसैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.