Shambhuraj Desai : आर्थिक स्थिती सुधारल्यावर शेतकरी कर्जमाफी : मंत्री शंभूराज देसाई; लाडक्या बहिणींमुळे ४० हजार कोटींचा बोजा

Satara News : ‘‘सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जाव्यात, असा माझा प्रयत्न राहील. जेथे ज्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. तेथे त्यांनी लढावे.
"Minister Shambhuraj Desai addresses the future of farmers' loan waiver amid Maharashtra's economic recovery.
"Minister Shambhuraj Desai addresses the future of farmers' loan waiver amid Maharashtra's economic recovery.sakal
Updated on

कऱ्हाड : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; परंतु लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४० हजार कोटींचा आर्थिक ताण आला आहे. महाराष्ट्र हे आर्थिक शिस्त पाळणारे राज्य असून, वर्षभरात सरकारचे उत्पन्न वाढल्यानंतर त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com