esakal | कोकिसरे,गोकूळ,पेठ शिवापूर,सुळेवाडी,सोनवडेत रंगताेय देसाई- पाटणकर गटाचा प्रचार
sakal

बोलून बातमी शोधा

कोकिसरे,गोकूळ,पेठ शिवापूर,सुळेवाडी,सोनवडेत रंगताेय देसाई- पाटणकर गटाचा प्रचार

सत्ता मिळवण्यासाठी पारंपरिक देसाई आणि पाटणकर गटामध्ये चुरस पाहण्यास मिळत आहे.

कोकिसरे,गोकूळ,पेठ शिवापूर,सुळेवाडी,सोनवडेत रंगताेय देसाई- पाटणकर गटाचा प्रचार

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर दुरंगी लढत होणार आहे. त्यामध्ये देसाई गट विरुद्ध पाटणकर गट असाच संघर्ष पाहण्यास मिळत आहे. शैलक्‍या भाषेतील टीका आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या चर्चा चौकाचौकांत सुरू आहेत. ग्रामपंचायचत निवडणुकीत सत्ता खेचून आणण्यासाठी दोन्ही गटांच्या उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाली लावली आहे. मोरणा विभागातील कोकिसरे, गोकूळ तर्फ पाटण, पेठ शिवापूर, सुळेवाडी, सोनवडे, या ग्रामपंचायत निवडणुका या दुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या कोकिसरे, गोकूळ तर्फ पाटण, सुळेवाडी, सोनवडे या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लक्ष आहे. पेठ शिवापूर हे जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू यांचे गाव. या विभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक लढत पाहण्यास मिळत आहे. शिवसेनेत अंतर्गत बंडखोरी सुरू आहे. सोनवडेत एकाच गटांतर्गत संघर्ष पाहण्यास मिळत आहे. प्रचारात शैलक्‍या भाषेतील टीका आणि एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांच्या चर्चा चौकाचौकांत ऐकण्यास मिळत आहेत. कोकिसरेमध्ये गटांतर्गत राजकारणाला कुरघोड्यांनी उफाळून आले आहे. देसाई गटातील काहींनी पाटणकर गटाला हाताशी धरून व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. मनसेने त्यात उडी घेऊन ताकद दाखवण्याच प्रयत्न केला आहे. सत्ता मिळवण्यासाठी पारंपरिक देसाई आणि पाटणकर गटामध्ये चुरस पाहण्यास मिळत आहे. आटोली पाचगणी, काहीर, आंबेघर तर्फ मरळी, आडदेव या ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या आहेत.

लोणंद बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरूच 

उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; अभी के अभी म्हणत उडवली पुन्हा काॅलर 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार कारभार पाहात आहे; परंतु त्यांच्या धोरणाकडे स्थानिक नेत्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावापासून आपला गट आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न राजकीय नेतृत्वाकडून होताना दिसत आहे.

महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु

Edited By : Siddharth Latkar

loading image