

Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
sakal
सातारा : हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी ज्या प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणी आल्या, त्या तुलनेत सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक सुलभ असणार आहे. या आरक्षण समितीवर छत्रपती घराण्याचे वंशज सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असून, त्यांचा याबाबतचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.