Shambhuraj Desai: वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा जपावी : शंभूराज देसाई; अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई
Satara News : पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवून दिंड्यांचे स्वागत व आदरातिथ्य करण्याची लोणंदसह जिल्ह्याची परंपरा आहे. ती परंपरा राखून यावर्षीही वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद घ्यावा.
Minister Shambhuraj Desai addressing media on Warkari Seva, vows tough action against any disruption to the pilgrimage.Sakal
लोणंद : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आदी सोयीसुविधा चांगल्या प्रकारे पुरवून वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनी यावर्षीही जपावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.