esakal | पाटण तालुक्‍यात Oxygen Bed वाढवणार; गृहराज्यमंत्र्यांची दौलतनगरात ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

पाटण तालुक्‍यात Oxygen Bed वाढवणार; गृहराज्यमंत्र्यांची दौलतनगरात ग्वाही

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : दौलतनगर व ढेबेवाडीतील कोरोना उपचार केंद्रांमध्ये 75 ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपचार केंद्रातील सुविधांसाठी आठ दिवसांत आवश्‍यक निधी देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिली आहे. (Shambhuraj Desai Testifies To Increase Oxygen Beds In Patan Taluka Satara News)

दौलतनगर येथे मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्‍यातील कोरोना (Corona) आढावा बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोंपे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कुराडे, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Good News : दिवाळखोरीत गेलेली कराड जनता बॅंक ठेवीदारांचे पैसे करणार परत

मंत्री देसाई म्हणाले, "पाटण तालुक्‍यात 674 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 124 रुग्णांवर उपचार सुरू असून 540 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयातील बेडची क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्‍सिजन बेडची कमतरता भासू नये, यासाठी दौलतनगरला 25, पाटणला 50 अतिरिक्त ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येतील. तिन्ही उपचार केंद्रांसाठी अतिरिक्त डॉक्‍टर, नर्सेस व कर्मचारीही देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येतील. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना सातारा किंवा कऱ्हाडला पाठवावे लागत आहे. त्याचा विचार करून पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सोय करणार असल्याचेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

Shambhuraj Desai Testifies To Increase Oxygen Beds In Patan Taluka Satara News