esakal | Good News : दिवाळखोरीत गेलेली कराड जनता बॅंक ठेवीदारांचे पैसे करणार परत
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Janata Bank

Good News : दिवाळखोरीत गेलेली कराड जनता बॅंक ठेवीदारांचे पैसे करणार परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : दिवाळखोरीत गेलेली येथील कराड जनता सहकारी बॅंकेच्या (Karad Janata Bank) पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया आजपासून (बुधवारी) सुरू होत आहे, अशी माहिती बॅंकेचे अवसायानिक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. ठेवीदारांच्या (Depositors) अन्य बॅंकेच्या खात्यात त्यांचे थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जनता बॅंकेत कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे. (Karad Janata Bank Will Pay Depositors From Today Satara News)

ते म्हणाले, "कराड जनता बॅंक 7 डिसेंबर 2020 रोजी अवसायनात गेली. पाच लाखांसह त्याच्या आतील ठेवींना विम्याचे संरक्षण असल्याने ते पैसे परत मिळणार होते. त्याची कागदोपत्री पूर्तता झाल्याने पहिल्या टप्प्यात 39 हजार 32 ठेवीदारांचे 329 कोटी 76 लाखांची रक्कम मंजूर झाली. विमा कंपनीने पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे विहीत नमुन्यात व आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज भरून घेतले. त्यानुसार रक्कम मंजूर झाली आहे. ती रक्कम ठेवीदारांना आजपासून (बुधवार) दिली जाणार आहे. ठेवीदारांना त्यांच्या बॅंकेतील खात्यात रक्कम जमा होणार आहे.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कऱ्हाडात भाजपचे आंदोलन

कोरोनाचा प्रादुर्भाव, शासनाच्या निर्बंधांमुळे कोणत्याही स्थितीत ठेवीदारांनी शाखेत गर्दी करू नये. मंजूर यादीप्रमाणे शाखा ज्यांना सूचना देईल, त्यांनी त्या वेळेत मूळ कागदपत्रांसह त्या शाखेशी संपर्क करावा. मंजूर रक्कम खात्यात जमा करण्यास तीन महिन्यांचा कालावधी आहे. कोविडमुळे तो वाढण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारे गडबड करण्याची गरज नाही. शाखेत बोलवल्यानंतर मूळ ठेव पावत्या, आधारकार्ड व पॅनकार्डसहीत पासबुक घेऊन यावे. बॅंक त्याची पडताळणी करून पुढील सात दिवसांत ठेवीदार कळवतील. त्या अन्य बॅंकेतील खात्यात पैसे जमा करण्याबाबत कार्यवाही करेल. बॅंकेची यादी विमा कंपनीच्या सूचनेनुसार बॅंक आँफ बडोदाकडे जाईल. त्या यादीनुसार संबंधित ठेवीदारांच्या खात्यावर मंजूर रक्कम वर्ग केली जाईल.''

मराठा आरक्षण का मिळाले नाही शिवेंद्रसिंहराजेंनी केला उलगडा

त्रुटी दूर करण्याचे काम सुरू

काही ठेवीदारांचे प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे मंजूर नाहीत. त्यांना बॅंक संपर्क करून आवश्‍यक त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू आहे. त्या ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्‍लेमफॉर्म जमा केलेले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या शाखेत आवश्‍यक कागदपत्रांसह ते जमा करावेत, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.

Karad Janata Bank Will Pay Depositors From Today Satara News