शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा मोठेपणा दाखवला : रामराजे

Ramraje Naik-Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkaresakal
Summary

'आता पॅनलचा विषय संपलाय. आतलं-बाहेरचं सगळंच संपलंय, याकडं दुर्लक्ष करा.'

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party) सहकार पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांचे पुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील (Nitin Patil) यांची बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

रामराजे म्हणाले, प्रथेप्रमाणे आज जिल्हा बॅंक अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यामुळं आता पॅनलचा विषय संपलाय. आतलं-बाहेरचं सगळंच संपलंय. आपली जिल्हा बॅंक आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी जाईल, याकडं लक्ष देणार असून जगातील रोबो बॅंकेशी तुलना व्हावी, यासाठी सर्व सहकाऱ्यांचं पाठबळ मिळावं. दरम्यान, निवडणुकीत बरंच काही घडून गेलंय, असं म्हणत रामराजेंनी आता त्या विषयाकडं न जाता बॅंकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं त्यांनी आवाहन केलं. शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendrasinharaje Bhosle) मनाचा मोठेपणा दाखवून हे सगळं घडवून आणलंय. त्यांचं मी आभार मानतो, असंही ते म्हणाले.

Satara District Bank Election
Satara District Bank Election
Ramraje Naik-Nimbalkar
शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात

आज सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. दरम्यान, निवडीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या समर्थकांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.

Ramraje Naik-Nimbalkar
'भाजपनं 276 जागा जिंकून दाखवावं, मी राजीनामा देईन'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com