Sharad Pawar Resign : शरद पवारांचे मानाचे स्थान कायम राहील; पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं
Sharad Pawar Resign
Sharad Pawar Resignsakal

कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्ाय पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा हा निर्णय त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांचे राजकारणातील मानाचे स्थान कायम राहिल. त्यांनी राजीनामा देण्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर प्रतिक्रीया देताना आमदार चव्हाण म्हणाले, जेष्ठ नेते पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच राजीनामा दिलेला आहे. हा निर्णय त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे.

मात्र त्यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांचे राजकारणातील मानाचे स्थान कायम राहिल. त्यांच्या राजीनामा देण्याचा महविकास आघाडीवर परिणाम होईल, असे वाटत नाही. आमच्या कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष होत्या. आता मल्लिकर्जुन खर्गे आहेत. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरताच असेही असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com