esakal | 'कृषी'तील कार्याबद्दल शरद पवारांनी केलं यशवंतराव, मालोजीराजेंचं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

आधुनिक विज्ञानाचा आधार घेत शेतीसह दुग्धव्यवसाय क्षेत्रांमध्ये फलटणात सुलभ असं काम सुरु आहे.

'कृषी'तील कार्याबद्दल शरद पवारांनी केलं यशवंतराव, मालोजीराजेंचं कौतुक

sakal_logo
By
संजय जामदार

कोळकी (सातारा) : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) व स्व. श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर (Malojiraje Naik-Nimbalkar) यांनी त्यावेळीपासून कृषी क्षेत्राला महत्व दिलं. तो विचार घेऊनच फलटण येथे आजही कामकाज केलं जात आहे. आधुनिक विज्ञानाचा आधार घेत शेतीसह दुग्धव्यवसाय क्षेत्रांमध्ये सुलभ असे कामकाज फलटण येथे सुरु आहे, अशा सर्व गोष्टींमुळे फलटणातील कृषी महाविद्यालय (Phaltan Agriculture College) व उद्यानविद्या महाविद्यालय यांचे संस्थाचालक, संस्थेमध्ये कार्यरत असणारे अध्यापक व त्यांचे सहकारी हे अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले.

फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटी (Phaltan Education Society) संचलित कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या कार्याचा आढावा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव (बापू), हेमंत रानडे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, तुषार नाईक निंबाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: NCP अध्यक्ष शरद पवार फलटणात

Sharad Pawar

Sharad Pawar

या वेळी कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या जमिनीबाबत काही समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक लावून आगामी काळामध्ये प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या कामकाजाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी या वेळेस दिली. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टसच्या वतीने मुरघास उत्पादन व मुक्त संचार गोठा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती डॉ. शांताराम गायकवाड यांनी दिली.

loading image
go to top