Success Story: 'गावचा उपसरपंच झाला मुंबई पोलीस'; शरद सोनवलकरांची काैतुकास्पद कामगिरी, सोनवडी खुर्दमध्ये जल्लाेष
Satara News : गेली चार वर्ष ते उपसरपंच पदी काम करत गावामध्ये विविध कामे केली. परंतु त्यांचे मन इथे रमेना तरुणपणापासून लागलेली देशसेवेची ओढ त्यांना काही शांत बसून देत नव्हती. त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचे ठरवले.
Sharad Sonwalkar from Sonwadi Khurd selected for Mumbai Police; villagers celebrate his remarkable achievement.Sakal
दुधेबावी : सोनवडी खुर्द( ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद अरविंद सोनवलकर यांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस भरती 2024 मध्ये मुंबई पोलीस येथे पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे...