

Shashikant Shinde
Sakal
केळघर: ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही समन्वयाचा मार्ग काढत आहोत. तालुक्यातील सर्व निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांना सोबत घेऊन एकत्र एका चिन्हावर उमेदवार उभे करत आहोत. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कुसुंबी गट, कुसुंबी गण व आंबेघर गण शिवसेना, म्हसवे गट, म्हसवे गण, खर्शी बारामुरे गण व कुडाळ गट, कुडाळ गण व सायगाव गण राष्ट्रवादी पक्ष लढणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. मेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.