
सातारारोड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार शशिकांत शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूरमध्ये भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे आणि यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे आमदार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.